वणी टाईम्स न्युज : शहरातील भीमनगर मोहल्ला येथे एका विवाहित युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. उज्ज्वल चरणदास कांबळे (30) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचा नाव आहे. रविवारी रात्री 11 वाजता नंतर त्याची पत्नी व मुलं झोपल्यानंतर त्यांनी गळफास घेतला. त्याच्या मागे पत्नी, एक लहान मुलगा व मुलगी आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.