वणी टाईम्स न्युज : विदर्भाच्या क्रीडा क्षेत्रात प्रथमच सिलंबम या खेळाचे आयोजन सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलंबम असोसिएशन द्वारा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय लाठीकाठी चॅम्पियनशिपचे आयोजन दि 28 व 29 सप्टेंबरला भद्रावती येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत वणी येथील शिवआनंद लाठी काठी ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ प्रदर्शन करुन 7 सुवर्ण पदक, 6 रोप्य तर 3 ब्राँझ पदके पटकाविले. वणीच्या खेळ इतिहासात या खेळात पहिल्यांदाच इतका मोठा विक्रम झाल्याचे बोलल्या जात आहे.
शिव आनंद लाठीकाठी ग्रुपच्या महेश्वरी राजु गव्हाणे हिने 1 सुवर्ण 1 ब्राँझ पदक मिळविले. तर श्रावणी घोसरे 2 सुवर्ण, मोक्षिता देठे 1 सुवर्ण 1 रौप्य, दुष्यंत गव्हाणे 1 रौप्य 1 ब्राँझ, खुशी सहारे 1 सुवर्ण 1 रौप्य, ज्योती सहारे 1 रौप्य 1 ब्राँझ, जान्हवी चिकटे 2 रौप्य आणि तेजस्विनी गव्हाणे हिने 2 सुवर्ण पदक मिळविले. यावेळी लाठी काठी ग्रुपचे कोच राजु देवराव गव्हाणे यांचा उत्कृष्ठ कोच म्हणुन सन्मान करण्यात आला.
स्पर्धा जिंकून सदर खेळाडू वणीत दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी, समाजसेवक डॉ महेंद्र लोढा यांनी गृपमधील सर्व खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.