वणी टाईम्स न्युज : कधी कधी आपण स्वतः केलेली चूक आपल्याला महागात पडतात. लोखंडी कपाटात पैसे आणि दागिने ठेवून त्याची चावी कपाटाच्या वर ठेवणे एका महिलेला चांगलेच भोवले. महिला कामावर गेल्यावर अज्ञात चोरट्याने चावीच्या सहाय्याने कपाट खोलून लॉकर मध्ये ठेवलेले 25 हजार रोख व 35 हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले. तब्बल 17 दिवसानंतर पैश्याची गरज असल्याने महिलेने कपाट उघडले, तेव्हा ही घटना लक्षात आली.
फिर्यादी महिला भाग्यश्री संदीप गेडाम (32) रा. छत्रपती नगर, गेडाम ले आऊट वणी हिने दिलेल्या तक्रारीनुसार ती मोरे यांचे घरी भाड्याने राहत असून घरकाम करतात. फिर्यादी हिने 5 सप्टेंबर रोजी बचत गटातून उचललेले 25 हजार रुपये तसेच सोन्याचे लॉकेट व मणी असलेली गळ्यातील मंगळसूत्र आणि झुमके घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवून लॉकरची चावी बाजूच्या ड्रॉवरमध्ये ठेवली. तर कपाट बंद करून त्याची चाबी कपाटाच्या वर ठेवून दिली.
दिनांक 22 सप्टेंबर रोजी पैशाची गरज असल्याने फिर्यादी महिलेने कपाट खोलून त्यातला लॉकर उघडला असता पैसे व दागिने दिसून पडले नाही. घरात शोध घेतला असता कुठेही पैसे व दागिने मिळून आले नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने चाबिने अल्मारी व त्यामधील लॉकर खोलून 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची तक्रार महिलेने वणी पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 305 (a) नुसार गुन्हा दाखल केला आहे.