वणी टाईम्स न्युज : गावातील अवैध दारु विक्री विरोधात दंड थोपटून दारु विक्रीचा अड्डा नष्ट करणाऱ्या महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सन्मान केला आहे. मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी व गोंड बुरांडा येथील महिलांचा मनसेचे वणी कार्यालयात मनसे नेते राजू उंबरकर यांनी सत्कार करताना महिलांनी उचललेल्या या धाडसी पाउलाचे समर्थन केले.
मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा व वनोजादेवी या गावात अवैधरीत्या दारुची विक्रीमुळे ग्रामीण महिला त्रस्त झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात अनेकदा मौखिक तक्रार करून ही दारु विक्रेत्या विरुद्ध कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. उलट दारु विक्रेत्याची मुजोरी वाढली. शेवटी मनसेच्या महिला पदाधिकारी व इतर महिलांनी अवैध दारु विक्रीच्या ठिकाणी जाऊन दारु पकडली. संतापलेल्या महिलांनी पकडलेली दारूच्या शिष्या फोडल्या व जाळून नष्ट केल्या.
अवैध दारू विक्री पकडुन नष्ट करणाऱ्या अर्चना सोनटक्के, सिंधु सोनटक्के, वनिता ढोके, माया कडूकर, लता लखमापुरे, इंदिरा सोनटक्के, सुनिता सोनटक्के, माया ढोके, सोनु काळे, सुनंदा राजूरकर ,सुनीता सोनटक्के, सिमा शिंदे, मंजुषा ढोके, माला क्षीरसागर, उज्जवला बरडे, अनुसया शेडमाके, शांता आत्राम या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार , महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या मारेगाव तालुकाध्यक्ष उज्वला चंदनखेडे, मनसे वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, मारेगाव शहर संघटक नबी शेख यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वनोजादेवी आणि गोंड बुरांडा येथे अवैध दारु विक्रीमुळे अनेक कुटुंबं बरबाद झाले. अनेक तरुण युवा व्यसनाधीन होण्याच्या मार्गावर आहे. वारंवार तक्रार करूनही कार्यवाही न झाल्याने संतप्त महिलांनी उचललेले हे पाऊल समाजासाठी आदर्श आहे. मतदार संघातील सर्व भगिनीचा भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे. असं मत राजू उंबरकर यांनी यावेळी व्यक्त केले.