वणी टाईम्स न्युज : गरजू लोकांना मदत करणे हीच सर्वोच्च मानव सेवा आहे. माझ्या हातातून लोकांना मदत होत आहे, हे माझे नशीब आहे. असे उदगार भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता विजय चोरडिया यांनी व्यक्त केले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढ दिवसानिमित्त मारेगाव येथे दिव्यांगाना सायकल व महिलांना साडी वाटप कार्यक्रमात बोलत होते. मारेगाव येथील हनुमान मंदिरातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चोऱडिया तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शंकर लालसरे, प्रशांत नांदे, अशोक सिंग, मनोज केळकर, मयूर गोयनका, राजू धावंजेवार, अनुप महाकुलकर, सागर मुने आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमात मारेगाव तालुक्यातील दिव्यांग बंधूंना तीनचाकी सायकल तर महिलांना साडीचे वाटप करण्यात आले.