जितेंद्र कोठारी, वणी : एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी अथवा मदतीसाठी धावणार्या व्यक्तीला ‘देवदूत’ संबोधले जाते. या धर्तीवर ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर हे वणी विधानसभा क्षेत्रातील शेकडो गोरगरीब रुग्णांसाठी ‘देवदूत’ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नुकतेच मारेगाव तालुक्यातील गोंड (बुरांडा) येथील पौर्णिमा दगडे हिच्या गर्भाशयातील गाठ काढण्यासाठी तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक होती. परंतु घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे सदर महिला गर्भाशयाच्या गाठीचे उपचार करण्यास असक्षम होत्या. अशा परिस्थितीत त्या महिलेच्या कुटुंबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर बाब मनसे नेते राजू उंबरकर यांच्या निदर्शनास आणून दिली.
राजू उंबरकर यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर महिलेला वणी शहरातील नामांकित खाजगी रुग्णालयामध्ये तातडीने उपचार करिता दाखल केले. जिथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पोटातील गाठ बाहेर काढली. तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारा सर्व खर्च राजू उंबरकर यांनी उचलला. आज सदर महिला पौर्णिमा दगडे सुखरूप असून कुटुंबाने आनंद व्यक्त करत राजू उंबरकर यांचे आभार मानले आहे.
यापूर्वीही राजू उंबरकर यांनी वणी विधानसभेतील अनेक रुग्णांचे उपचारासाठी तन मन धनाने मदत केली आहे. त्यात बँक कॉलनीतील आकाश बगडे या तरुणाचे नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी राजू उंबरकर यांनी तब्बल 5 लाखाची मदत मनसेच्या माध्यमातून केली. एवढंच नव्हे तर स्वतः नागपूर येथे रुग्णालयात जाऊन त्याची तब्येतीची विचारपूस केली. शिवाय रामपूरा भागातील आदित्य व कोरंबी येथील सूरज काळे या गरीब कुटुंबातील तरुणाचा उपचार खर्च राजू उंबरकर यांनी उचलले.
राजू उंबरकर हे नेहमीच अडीअडचणीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. गरजू रुग्णांचा उपचारच नव्हे तर गरीब शेतकऱ्यांच्या मुलींचे शिक्षण आणि लग्न, अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे वाटप, कृषी साहित्य, प्रत्येक समाजातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी हजर राहून सहकार्य करण्याची भूमिका राजू उंबरकर पार पाडतात. आणि त्यांच्या या भूमिकेमुळे विधानसभा क्षेत्रातील महिला, शेतकरी, कर्मचारीवर्ग, कामगार, विद्यार्थी त्यांच्याकडे हक्काने मदत मागतात.