वणी टाईम्स न्युज : वातावरणात बदल झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरात डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. या आजारामुळे अनेक नागरिक गंभीर आजारी पडले आहे, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नगर परिषद आरोग्य विभागाच्या वतीने डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेस पार्टीने केली आहे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व गटार, रस्ते साचलेले पाणी स्वच्छ करणे, डेंग्यू मच्छर प्रतिबंधक फवारणी करणे, डेंग्यू आजाराबाबत समाजात जनजागृती मोहीम राबविणे आणि रुग्णालयात डेंग्यू उपचाराचे विशेष कक्ष तयार करण्यात यावा. अशी मागणी नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात डेंग्यू बाबत उपाय योजना न केल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम पावडे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष श्यामाताई तोटेवार, जिल्हा मध्य. बँकेचे माजी अध्यक्ष टीकाराम कोंगरे, डॉ. महेंद्र लोढा, संध्या बोबडे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नईम अजीज, माजी नगरसेवक सिद्दिक रंगरेज, वंदना आवारी, संगीता खाडे, मंगला झिलपे, आशा टोंगे, साधना गोहोकार, वंदना धगडी, शालिनी रासेकर, विजयालक्ष्मी आगबत्तलवार तसेच अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.