वणी टाईम्स न्युज : मारेगाव तालुक्यातील दापोरा फाट्याजवळ उपशा नाल्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा अखेर मृतदेह आढळला. मेघश्याम नारायण वासाडे (58) रा. चिंचमंडळ असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार चिंचमंडळ येथील शेतकरी मेघश्याम वासाडे सोमवारी सकाळी 11 वाजता दरम्यान आपले पशुधन घेऊन शेताकडे जात होते. तालुक्यात मागील 10 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून नदी नाले ओसंडून वाहत आहे. अशातच जनावरांसह नाला पार करीत असताना शेतकरी वासाडे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
पुरात इसम वाहून गेल्याची माहिती मिळताच महसूल अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. नाल्यात शोध मोहीम सुरु करण्यात आली असता दुपारी 2 वाजता दरम्यान मेघश्याम वासाडे यांचा मृतदेह काही अंतरावर आढलून आला. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मृतक मृतक मेघश्याम वासाडे यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुली, नातवंड असा कुटुंब आहे.