वणी : मारेगाव तालुक्यातील एका गावात कापूस वेचणीसाठी शेतात गेलेली अल्पवयीन मुलगी सायंकाळी घरी परत आलीच नाही. नऊ दिवस शोध घेऊनही मुलगी मिळून आली नाही. त्यामुळे बेपत्ता मुलीच्या वडिलांनी 23 डिसे. रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने त्यांची अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार मुलगी गावातील मजूरदार महिलांसोबत ऑटोमध्ये बसून 14 डिसे. रोजी महेसदोडका येथे कापूस वेचणीसाठी गेली होती. सायंकाळी सर्व मजूर महिला परत गावात आल्या. मात्र मुलगी परत घरी आलीच नाही. गावात व नातेवाईकांकडे शोध घेऊनही मुलगी मिळून आली नाही. त्यामुळे फिर्यादी वडिलांनी आपल्या पत्नीसोबत मारेगाव पोलीस ठाणे गाठून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांची 17 वर्षाची अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्द कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.