वणी टाईम्स न्युज : शहरात चोरी, घरफोडी, दरोडा सारखी घटना घडत असताना चोरट्यांनी राज्य मार्गावरील टायर दुरुस्ती दुकानासमोर ठेवलेले ट्रकचे 25 टायर चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी नैमुद्दिन मोहम्मद नसीम शेख रा. राजूर व मो. जाहिद हदीस अली, रा. लालगुडा वणी यांची वणी यवतमाळ राज्य मार्गावर लालपुलिया परिसरात टायर पंक्चर व दुरुस्तीचे दुकाने आहे. फिर्यादी यांचे जुने टायर खरेदी विक्रीचे काम असल्याने त्यांच्या दुकानाबाहेर नेहमी जुने वापरते टायर ठेवून असतात.
दिनांक 28 एप्रिल रोजी फिर्यादी आपली दुकाने बंद करून घरी गेले होते. सकाळी दुकाने उघडली असता नैमुद्दिन मोहम्मद नसीम शेख यांच्या दुकानासमोर ठेवलेले 15 जुने टायर किंमत 7 हजार 500 रुपये चोरी झाल्याचे आढळून आले. तर फिर्यादी मो. जाहिद हदीस अली यांच्या दुकानाबाहेर ठेवलेले 10 टायर किंमत 5 हजार हे चोरट्यांनी लंपास केले. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.