जितेंद्र कोठारी, वणी : अयोध्येतील राम मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या कपाळावर टिळा लावणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ सद्य सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. अमित सिंह नावाच्या एका क्रिप्टो एज्युकेटरने बनविलेल्या या व्हिडिओत गोलू नावाच्या मुलाच्या तोंडातून त्याची महिन्याची कमाई ऐकून तुम्ही हैराण होणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटी त्या मुलाने दिलला उत्तर ऐकून त्याच्या आत्मविश्वासबद्दल कौतुक करावस वाटते.
व्हायरल व्हिडिओत हा मुलगा सांगतो की सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांच्या कपाळावर शेंदूर आणि चंदनाचा टिळा लावण्याचा काम करतो. या कामातून त्याला दिवसभरात जवळपास 1500 रुपये कमाई होते. अमित सिंग यांनी गोलूला विचारले की याचा अर्थ तुझा पगार 45 हजार म्हणजे एका डॉक्टरच्या बरोबरीचा आहे. त्यावर गोलूने स्मितहास्य करत उत्तर दिलं की, ‘डॉक्टर से कम समझे हो क्या ?’
व्हिडिओ बनविणाऱ्या अमित सिंग यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पुढे लिहिले – अयोध्येचा गोलू भारतातील बहुतेक व्यावसायिकांपेक्षा अधिक कमावतो. पण त्याहीपेक्षा जास्त आहे तिचा आत्मविश्वास, स्वैग आणि स्वातंत्र्याची भावना जी कशाच्याही पलीकडे आहे. गोलूकडे तो स्ट्रीट स्मार्टनेस आहे जो शोधण्यासाठी मोठ्या कंपन्या आयआयएमसारख्या बिझनेस स्कूलमध्ये जातात. पण, प्रत्यक्षात भारताच्या गल्लीबोळात असे अगणित ‘गोलू’ फिरत आहेत, ज्यांच्या प्रत्येकाच्या मनात तितक्याच धैर्याने आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. या तरुण कलागुणांना योग्य शिक्षण किंवा व्यावसायिक मार्गदर्शन मिळाले तर कल्पना करा! तीस वर्षे पुढे बघितली तर हे लोक एका मोठ्या मॅनेजमेंट कॉलेजच्या वर्गासमोर उभे राहून व्याख्याने देत असतील.
बघा व्हिडिओ :