• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

गुटखा तस्करांना अभय : पोलिस प्रशासन विरोधात युवासेनेचे आक्रमक धरणे आंदोलन

📌 गुटखा तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीलाअटक व तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

Wani Times by Wani Times
January 27, 2026
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 821

वणी टाईम्स न्युज: शहरातील पंचशील नगर येथे दिनांक 8 डिसेंबर रोजी आढळलेल्या अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवासेनेने दंड थोपटला आहे. गुन्हा दाखल होऊनही गुटखा तस्करांना अभय देणाऱ्या वणी पोलिस प्रशासनाविरुद्ध युवासेना उप जिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी सोमवार 26 जानेवारी रोजी पोलिस स्टेशन समोर धरणे आंदोलन सुरू केले.

उल्लेखनीय आहे की, दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी शहरातील पंचशील नगर येथे एका चारचाकी वाहनातून अवैध गुटखा व तंबाखू पुरवठा होत असताना पोलिसांनी धाड टाकली. मात्र पोलिस येताच तस्करांनी वाहनातील गुटखा व तंबाखूची पोते रस्त्यावर फेकून MH24 BL7051 क्रमांकाची Eco कारसह पळ काढला. सदर प्रकरणी दोन दिवसानंतर अन्न व औषध अधिकाऱ्याच्या फिर्यादवरून अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संपूर्ण वणी उप विभागात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू तस्करी करणाऱ्या तस्करांमध्ये कोरपना येथील मकसूद याचा नाव प्रामुख्याने चर्चिले जाते. दिनांक 8 डिसेंबर रोजी पकडण्यात असलेला तंबाखू साठाचा सूत्रधार मकसूद असल्याचे बोलले जाते. मात्र मकसूदचे स्थानिक नातेवाईक व एका नेत्याच्या मध्यस्थीने त्याच रात्री “सेटिंग” झाल्याचीही चर्चा ऐकायला मिळाली. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांकडून पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप अजिंक्य शेंडे यांनी केला आहे.

संबंधित गुटखा तस्कराची ओळख पटवून त्याला अटक करणे, गुटखा तस्करीमध्ये वापरण्यात आलेली Eco व्हॅन क्रमांक MH24 BL7051 जप्त करणे तसेच तपासात दिरंगाई करणाऱ्या तपास अधिकारी पीएसआय सुदाम आसोरे यांचे निलंबन करण्याची मागणीला घेऊन युवासेना उप जिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत दोनदा पत्रव्यवहार केले. परंतु स्थानिक पोलिस प्रशासनाने मागणीला केराची टोपली दाखवत गुटखा तस्करांविरुद्ध तुशभरही कारवाई केली नाही. शेवटी कारवाईसाठी अजिंक्य शेंडे यांनी धरणे आंदोलनाचा हत्यार उपसला.

या आंदोलनास आमदार संजय देरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे, राजू तुराणकर, आयुष ठाकरे, बंडू चांदेकर, दिलीप काकडे, गणपत लेडांगे, सुधीर थेरे, पुरुषोत्तम बुटे, लढा संघटनेचे प्रविण खानझोडे, नगरसेवक अजय धोबे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

यावेळी आमदार संजय देरकर यांनी उपविभागीय पोलीसअधिकारी व वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याशी सविस्तर चर्चा करून पोलीस प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत, आठ दिवसांच्या आत गुटखा तस्करीसह सर्व प्रकारचे अवैध धंदे पूर्णतः बंद करून संबंधित तस्करांना अटक करण्यात यावी, अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम अल्टीमेटम दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी लेखी व तोंडी स्वरूपात कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले, अशी माहिती युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दिली.

Tags: illigal tobacco smugglingLead storywani policeyuvasena
TweetSendShareShare
Previous Post

विराणी हॉल परिसरात माथेफिरूचा हैदोस; रॉडच्या हल्ल्यातून लहान मुलगा थोडक्यात बचावला

Next Post

प्रेस वेलफेअर असोसिएशन तर्फे आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL