वणी टाईम्स न्युज : महाशिवरात्रीचा उत्सव शांततेत पार पडावा, म्हणून वणी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मद्य विक्री आस्थापना बुधवार 26 फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी हे आदेश काढले आहे.

पोलीस स्टेशन हद्दीत वणी शहर व ग्रामीण भागामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, यवतमाळ यांनी दिलेले निर्देश व महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 142 (2) अन्वये प्राप्त अधिकाराचे वापर करून सर्व सि.एल-3, एफ.एल-3, सि.एल.-2, एफ.एल.-2 तसेच बियर शॉपी दि.26.02.2025 रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.
सदर आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये अटी व शर्तीचे भंगची कार्यवाही करण्यात येईल. तसेचअनुज्ञप्ती परवाना कायम स्वरुपी बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.










