वणी टाईम्स न्युज : येथील राम शेवाळकर परिसरात तिसऱ्या मजल्यावर असलेले महावितरण कार्यालयाची लिफ्ट बंद असून वृद्ध व महिला ग्राहकांना पायऱ्याचा डोंगर चढून कार्यालयात जावं लागत होते. याबाबत वणी टाईम्स न्युज पोर्टलने 25 ऑगस्ट रोजी “ग्राहकांचा छळ, कार्यालय तिसऱ्या मजल्यावर, जायचं कसं ?” ही बातमी प्रामुख्याने प्रकाशित केली होती.

वीज ग्राहकांची समस्या लक्षात घेऊन युवासेना उप जिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यानेसुद्धा महावितरण अधिकाऱ्यांना लिफ्ट तात्काळ सुरू करणे, नागरिकांना खालीवर नेण्यासाठी लिफ्टमॅन नियुक्त करणे बाबत निवेदन दिले होते. लिफ्ट तात्काळ दुरुस्ती करून सुरू न केल्यास महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेतर्फे देण्यात आला होता.
वणी टाइम्सची बातमी आणि युवासेनेच्या निवेदनाची दखल घेत महावितरण प्रशासनाने इंजिनियर बोलावून शनिवारी लिफ्ट सुरू केली. त्यामुळे वीज ग्राहकांना थेट तिसऱ्या मजल्यावर असलेल्या वीज वितरण कार्यालयात जाणे सोपे झाले आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना लिफ्टचे सिस्टिम समजत नसल्यामुळे लिफ्टमध्ये एका कर्मचाऱ्याची नेमणूक करणे गरजेचे आहे.
वणी टाइम्सची बातमी :










