वणी टाईम्स न्यूज : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस यंदा वणी शहरात सामाजिक बांधिलकीच्या अनोख्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या पुढाकाराने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना पावसापासून थोडीशी तरी कवच मिळावे, म्हणून मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

शहरातील रस्त्यावर फळभाजी विक्रेते, महिला शेतकरी, विद्यार्थी, हातगाडीवाले, फेरीवाले, या सर्व मेहनतकऱ्यांना पावसाळ्यातल्या अडथळ्यांमुळे मोठी अडचण होते. हीच गरज ओळखून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हा उपक्रम हाती घेऊन अजिंक्य शेंडे यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
छत्री वाटप कार्यक्रमात नितीन शिरभाते, कुंदन पेंदोर, रूपेश उपरे, मनोज वाकटी, विनोद ढूमने, राजु पाटील, संजोग झाडे, राजु मेश्राम, निलेश सूर्तीकर, संघर्ष शेंडे, कुणाल खामणकर, गौरव पांडे, निखिल मडावी आदी कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
छत्री वाटपाच्या या अनोख्या उपक्रमाने वणी शहरात सामाजिक जाणीवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. ठाकरे साहेबांच्या कार्यपद्धतीप्रमाणे, “जनतेसाठी झुकून काम करणे” हीच खरी शिवसेनेची ओळख उद्धव ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली.










