वणी टाईम्स न्युज: शहरातील रवीनगर भागात वास्तव्यास गोपालराव दिकुंडवार (87) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी पहाटे 4 वाजता दरम्यान निधन झाले. ते प्रख्यात बिल्डर व डेव्हलपर किरण दिकुंडवार यांचे वडील होते.

त्यांची अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता त्यांचे निवास स्थान “विजया” डिपी रोड, रवीनगर येथून मोक्षधामासाठी निघणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.
🙏 वणी टाईम्स न्युज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली










