वणी टाईम्स न्युज:

येथील गांधी चौक तुटीकमान जवळ असलेले वात्सल्य क्लिनिकचे संचालक बालरोग चिकित्सक डॉ. संतोष भोयर यांच्या पत्नी डॉ. प्रियंका भोयर (38) यांचे निधन झाले. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान त्यांना झोपेतच हृदयाघातचा झटका आला. सकाळी 8 वाजता पर्यंत जेव्हा त्या उठल्या नाही तेव्हा त्यांचे पती डॉ. संतोष भोयर यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या शरीरात हालचाली होत नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आपल्या डॉक्टर मित्रांना फोन करून माहिती दिली.
त्वचा रोग चिकित्सक डॉ. प्रियंका भोयर यांच्या अचानक निधनाने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालय वणी येथे पोस्टमार्टम करून कुटुंबियांना सोपविण्यात आले. काही वेळाने स्थानिक मोक्षधाम मध्ये डॉ. प्रियंका भोयर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे 7 वर्षाची चिमुकली मुलगी, पती व आप्त परिवार आहे.










