वणी टाईम्स न्युज : पर्यटनासाठी मित्रांसोबत गेलेल्या वणी येथील एका व्यावसायिकाचा पचमढी येथे पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. विनोद मुत्यलवार (53), रा. कनकवाडी वणी असे मृतक व्यावसायिकाचे नाव आहे. मृतक विनोद यांचे शिवतीर्थ कॉम्प्लेक्स वरोरा रोड येथे सायकल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे.

प्राप्त माहितीनुसार विनोद मुत्यलवार त्याचे पुत्र व काही मित्रांसह पर्यटन व दर्शनाच्या उद्देशाने 20 जुलै रोजी मध्यप्रदेश येथील पचमढी हिल स्टेशनवर गेले होते. मंगळवारी पहाटे तेथून नागद्वार जाण्याच्या त्यांची तयारी असताना विनोद यांना हार्टअटॅकचा जोरदार धक्का बसला व त्यांचा मृत्यू झाला. मृतक विनोद यांचे सोबत असलेला त्यांचा पुत्र व मित्र मृतदेह घेऊन वणीसाठी निघाल्याची माहिती आहे.









