वणी टाईम्स न्युज: एका उच्चशिक्षित आणि प्राचार्य असलेल्या शिक्षिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजता चिखलगाव येथे उघडकीस आली. युगंधरा स्वप्नील खरबडे (वय अंदाजे 35 वर्ष) असे मृतक महिलेचे नाव आहे. मृतक शिक्षिका चिखलगाव येथील महादेव नगरीत एका बहुमजली इमारतीत आपल्या फ्लॅटमध्ये पतीसह राहत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक युगंधरा ह्या येथील राजकुंवर महिला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. त्यांना 13 वर्षाचा एक मुलगा आणि 3 महिन्याची एक मुलगी आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांनी महादेव नगरीत फ्लॅट खरेदी केले होते. बुधवारी स्वप्निल हा कामानिमित्त मारेगाव येथे जाऊन होता. सायंकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा फ्लटचा दार आतून बंद होता. अनेकदा हाक मारून आणि दरवाजा ठोठावून ही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्याची पत्नी युगंधरा ही बेडरूम मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेबाबत मृतका युगंधराचे आईवडिलांना सूचना देण्यात आली असून ते तत्काळ वणी येथे पोहचले. मृतक शिक्षिकेच्या मागे पती, एक मुलगा आणि 3 महिन्याची चिमुकली आहे. तिनं आत्महत्या सारखा टोकाचा पाऊल का उचलला याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. बातमी लिहेपर्यंत वणी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी जमली होती.










