• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

आरोप : देवस्थानची जमीन खाजगी कोळसा कंपनीच्या घशात..!

▪️ जमीन विक्रीतून संजय देरकर यांनी करोडोंचा भ्रष्टाचार केल्याचा नांदेकर यांचा आरोप ▪️दोन वर्षात कोट्यावधी रुपयांच्या कोळशाचे अवैधरीत्या उत्खनन

Wani Times by Wani Times
November 11, 2024
in ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,296

वणी टाईम्स न्युज : हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या नावाने देवस्थानला दान दिलेल्या जमिनीचा संस्थेच्या सचिवांनी एका खाजगी कोळसा कंपनीसोबत संगनमत करुन परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला आहे. जमीन विक्रीतून संस्थेचे सचिव संजय देरकर यांनी करोडोचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोपही विश्वास नांदेकर यांनी केलं आहे. रविवारी दुपारी आयोजित एका पत्रकार परिषदेत नांदेकर यांनी याबाबत केलेल्या तक्रारी, जमिनीची विक्रीचे दस्तावेज व इतर पुरावे पत्रकारांसमोर सादर केले.

पत्रकार परिषदेत माहिती देताना विश्वास नांदेकर व सहकारी

पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सद्गुरू जगन्नाथ महाराजांचे परम भक्त कृष्णाजी मंदावार यांनी मौजा रुईकोट, तालुका -झरीजामणी (तत्कालीन मारेगाव तहसील) येथील आपल्या शेतजमीन पैकी गट क्रमांक 49/5 हा 2.02 हे.आर. भूखंड जगन्नाथ महाराज हयात असताना सन 1985 मध्ये त्यांना दान स्वरूप दिला. जगन्नाथ महाराज विदेही झाल्यानंतर सदर जमीन सद्गुरू जगन्नाथ महाराज देवस्थान, वेगांव तह. वणी या संस्थेच्या ताब्यात आहे. वणी येथील संजय नीलकंठराव देरकर या संस्थेचे सचिव आहेत.

मुकुटबन, रूईकोट, अर्धवन, पांढरकवडा परिसरात खाजगी कोळसा खाणी अस्तित्वात आल्यानंतर परिसरात शेतजमिनीचे दर गगनाला भिडले. दरम्यान मंदावार कुटुंबीयांनी दान दिलेले भूखंड सोडून आपल्या ताब्यातील उर्वरित शेती खाजगी कोळसा कंपनी मे. बी. एस. इस्पात लिमिटेड या कंपनीला विक्री केली. जगन्नाथ महाराज देवस्थान समितीच्या ताब्यातील भूखंड गट क्रमांक 49/5 हा रस्ता लगत असल्याने कोळसा खाणीकडे जाण्यास रस्ता राहिला नाही. अश्या परिस्थितीत बी. एस. इस्पात कंपनीने सदर संस्थेच्या विश्वस्त मंडळींशी संपर्क साधला.

जमीन विक्रीच्या पूर्वीच कोळसा उत्खनन केले

देवस्थान संस्थेच्या विश्वस्तांनी कोळसा कंपनीला सदर जमिनीवर कोळसा उत्खनन करण्याची परस्पर परवानगी दिली. त्यानंतर बी.एस. इस्पात लिमिटेड यांनी स्वतच्या मालकीच्या जमिनीला लागून असलेल्या संस्थेच्या 2.02 हे.आर.जमिनीची खरेदी न करता मागील 2 वर्षात तब्बल 50 कोटी रुपयांचा कोळसा देवस्थानचा जमिनीतून बेकायदेशीर उत्खनन केला. उत्खनन केलेल्या हजारो टन कोळशाचा पैसा संस्थेच्या खात्यात जमा न होता विश्वस्तांच्या खिशात गेल्याचा खळबळजनक आरोप विश्वास नांदेकर यांनी केला आहे. जगन्नाथ महाराज देवस्थान संस्थेची जमिनीवर बेकायदेशीर कोळसा उत्खनन बाबत माथार्जून येथील सामाजिक कार्यकर्ता बंडू देवाळकर यांनी 3 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हाधिकारी, खनिकर्म विभाग, धर्मदाय आयुक्त आणि मुकुटबन पोलीस ठाण्यात केली.

त्यानंतर संस्थेचे सचिव संजय देरकर व बी. एस. इस्पात कंपनी यांनी धावपळ करून 17 ऑक्टोबर 2024 रोजी या जमिनीचे विक्रीपत्र केले. विशेष म्हणजे मालमत्ता विक्रीपत्र करुन देताना कोळसा कंपनी कडून संपूर्ण रक्कम मिळाली नाही. तर कंपनीने 2025 पर्यंतचे पोस्ट डेटेड चेक संस्थेला दिले आहे. कोट्यावधी रुपयांची मनी लॉंड्रिंग प्रकरणी कंपनी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून बी.एस. इस्पात लिमिटेडची चौकशी सुरू आहे. अशात कोट्यवधीची जमीन या कंपनीला उधारीमध्ये विकण्यात आल्याचे आरोप विश्वास नांदेकर यांनी पत्र परिषदेत केला.

बी. एस. इस्पात कंपनी ED च्या रडारवर..!

मुकुटबन येथे खाजगी कोळसा कंपनी मे. बी.एस. इस्पात लिमिटेड मध्ये सुरवातीपासून अनेक गैरप्रकार सुरु आहे. कोळशाचे अवैध उत्खनन व वाहतूक, तसेच परवानगी नसताना खुल्या बाजारात कोळसा विक्री प्रकरणी कंपनीची चौकशी सुरू आहे. तर आता कोळसा विक्रीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची मनी लॉंड्रिंग प्रकरणी कंपनी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून बी.एस. इस्पात लिमिटेडची चौकशी सुरू आहे.

12 सप्टेंबर 2024 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने तहसील कार्यालय झरीजामणी यांना पत्र देऊन बी.एस. इस्पात लिमिटेड यांचे मालकीचे मौजा रुइकोट, तह. झरीजामणी येथील गट क्रमांक 46/1, 17/2, 49/1, 49/2, 49/3, 49/4, 19/2, 19/2(अ) व 48/1 या शेत जमिनीचे विक्री, फेरफार, हस्तांतरण, गहाण, धारणाधिकार या सर्व बाबीवर प्रतिबंध लावला आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार झरीजामणी यांनी 26 सप्टेंबर 2024 रोजी दुय्यम निबंधक झरीजामणी, मण्डल अधिकारी झरी व तलाठी रुईकोट यांना पत्र देऊन सदर जमिनीचे फेरफार व इतर बाबीवर बदल करण्यात येऊ नये. असे आदेश दिले आहे.

नांदेकर यांनी केलेले आरोप हताशेतून 

जगन्नाथ महाराज संस्थांचे संपूर्ण कारभार पारदर्शक आहे. धर्मदाय आयुक्त यांच्या परवानगीने जमीन बी.एस.इस्पात लिमिटेड कंपनीला विक्री करण्यात आली. निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने निर्माण झालेल्या हताशामुळे विश्वास नांदेकर माझ्यावर खोटेनाटे आरोप करीत आहे. संस्थेच्या वतीने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे.

संजय देरकर – सचिव, जगन्नाथ महाराज देवस्थान संस्था, वेगाव

Tags: Lead storySanjay Derkar
TweetSendShareShare
Previous Post

भाजप उमेदवाराचा गावोगावी प्रचार दौरा

Next Post

प्रहार जनशक्ती पक्षाचा राजू उंबरकर यांना पाठींबा

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL