वणी टाईम्स न्युज : भारतीय जनता पार्टी वणी शहर मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा सोमवारी, 21 जुलै रोजी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत भाजपचे युवा व निष्ठावान कार्यकर्ते, विलास किसनराव निमकर यांची शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विलास निमकर हे तेलीफैल येथील रहिवासी असून, पक्षात गेली अनेक वर्षे सक्रिय योगदान देत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान त्यांच्या प्रभाग क्रमांक 6 तेलीफैल,सिंधी कॉलनी, भीमनगर, दामले फैल येथून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळवून देण्यात त्यांची भुमिका महत्त्वाची ठरली होती.
निमकर हे सामाजिक, धार्मिक आणि युवकांशी निगडीत उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रस्थानी असतात. त्यांच्या समर्पित कार्यपद्धती, जनतेशी जवळचा संपर्क आणि स्थानिक समस्या समजून घेण्याची जाण यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना निमकर म्हणाले, “पक्ष व वरीष्ठांनी जो विश्वास दाखवला आहे, त्याचे चीज करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. ही जबाबदारी मला पक्ष सेवेबरोबरच जन सेवेसाठीही अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारी आहे.”
निमकर यांना शहर उपाध्यक्षपद देण्यात आल्याने स्थानिक पातळीवर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “एक खऱ्या अर्थाने निष्ठावान व जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य संधी मिळाली,” अशी भावना पक्षातून व्यक्त केली जात आहे.
श्री विलासभाऊ निमकर यांची भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल
💐 हार्दिक शुभेच्छा 💐
शुभेच्छुक : वैभव निमकर, पवन वंजारी, रोहित लोहकरे, पंकज कोटकर, आशिष मसुरकर, स्वप्नील निमकर, साहिल लोहकरे, सुमित कोडापे, अविनाश घाटोळे, भरत लोहकरे, कुणाल कामडी, रोशन गायधणे, शुभम पडोळे, सुजल वंजारी, अक्षय मंगरे, यश फाले, यश मशारकार आणी समस्त मित्र परिवार तेली फैल (वणी)









